आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकदिनी १२ जानेवारीपासून सुरू केलेल्या महाराष्ट्र व्हिजन फोरममध्ये २० दिवसांत १ लाख ५७ हजार ५१० युवकांनी सहभाग नोंदवला. यापैकी १८ हजार युवकांनी विविध मुद्द्यांवर उपाययोजनाही सुचवल्या. १ मेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात १० लाख युवक सहभागी होतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात पवार यांनी युवकांशी संवाद साधला. महाराष्ट्र व्हिजन फोरम ही संकल्पना मांडली. औरंगाबादेतील तरुणाईने पाणी, शिक्षण, कृषी, आरोग्य, इंडस्ट्री, भूक, सॅनिटायझेशन, गरिबी, एनर्जी आणि जेंडर समानता हे विषय हाताळणे आणि याबद्दल धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले.
आपण सगळ्यांना एकाच वेळी इम्प्रेस करू शकत नाही: या वेळी ते म्हणाले, शिक्षण आणि रोजगाराच्या तणावातून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २० लाख मुले दरवर्षी नोकरीच्या शोधात असतात. यापैकी ४० टक्के बेरोजगार राहतात. कोणताही निर्णय घेताना समाज काय म्हणेल याचा विचार करू नका. जवळच्या पाच व्यक्तींना काय वाटेल याविषयी सल्लामसलत करा. पण, एकाच वेळी खूप लोकांना इम्प्रेस करणे अशक्य आहे हे लक्षात ठेवले तर ताण येणार नाही. त्यामुळे विचारप्रक्रिया बदला, असा सल्ला त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.