आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर:या संकेतस्थळावर पाहता येईल, गुणपडताळीसाठी शनिवारपासून करा अर्ज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल 48% तर दहावीचा निकाल 39.76% लागला आहे.

मंडळालाच्या वतीने बारावीची लेखी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट घेण्यात आली. तर दहावीची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेत बारावीचे 21 आणि दहावीचे 25 केंद्र नेमण्यात आले होते. यात बारावीचा औरंगाबाद विभागाचा निकाल हा 48% लागला. परीक्षेसाठी 2575 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2537 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1218 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव विजय जोशी यांनी दिली.

दहावीच्या 2213 विद्यार्थ्यांनी नोंदणी

या बारावीच्या निकालात औरंगाबाद विभाग राज्यात प्रथम स्थानावर आला आहे असेही जोशी म्हणाले. तर दहावीचा निकाल 39.76% लागला आहे. दहावीसाठी 2213 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2067 जणांनी परीक्षा दिली तर 822 जण उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून दहावीच्या निकालात तिसऱ्या स्थानावर असल्याचे जोशी यांनी सांगितले. औरंगाबाद विभागात दहावीत 1 तर बारावीत एकही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे ते म्हणाले. निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थी पाहू शकतील.

गुणपडताळीसाठी शनिवारपासून करा अर्ज

विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. गुणपडताळणी 3 ते 12 सप्टेंबरपर्यंत तर छायाप्रतीसाठी 3 ते 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. गुणपडताळणी अर्ज करण्यासाठी दहावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...