आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जिल्हयाचा दहावीचा निकाल 91.93 टक्के, चार शासकिय आदिवासी आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चारही शासकिय आदिवासी आश्रमशाळांचा निकाल शंभर टक्के

हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९१.९३ टक्के लागला असून जिल्हयातील चारही शासकिय आदिवासी आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर दहावी परिक्षेतच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत.

हिंगोली जिल्हयातून यावर्षी इयत्ता दहावीच्या परिक्षेत १६३०२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १४९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९१.९३ टक्के लागला आहे. हिंगोली तालुक्यातून ४०८० पैकी ३ ६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९०.५८ टक्के लागला आहे. कळमनुरी ३३२५ पैकी ३०४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९१.६६ टक्के, वसमत ४३८२ पैकी ४०५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९२.५८ टक्के लागला आहे. औंढा २०३१ पैकी १८६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९१.७७ टक्के तर सेनगाव तालुक्यातील २४८४ विद्यार्थ्यांपैकी २३२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९३.५१ टक्के लागला आहे.

या परिक्षेतही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यातून ८५५२ मुलांपैकी ७६०० मुले उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८८.८७ टक्के आहे. तर ७७५० मुलींपैकी ७३८८ मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.३३ टक्के आहे. जिल्ह्यातून ४१८३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ५४७५ विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ४०६६ विद्यार्थी द्वितीय तर १२६४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

चारही शासकिय आदिवासी आश्रमशाळांचा निकाल शंभर टक्के

हिंगोली जिल्ह्यात असलेल्या बोथी, गोटेवाडी, पिंपळदरी व जामगव्हाण या चारही शासकिय आदिवासी आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी अभिनंदन केले आहे.