आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाने यंदा अक्षरश: ३० दिवसांतच २७ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित केले आहेत. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान पीजी, व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या होत्या. विद्यापीठ कॅम्पसमधील ८ अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाइन, तर १९ अभ्यासक्रमांचे ऑफलाइन मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केले आहेत.
संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू झाल्या होत्या. या परीक्षा संपताना मात्र वेगवेगळ्या तारखांना संपल्या आहेत. एमए फुले आंबेडकर थॉट्स, एमए योगा, भूगोल, गणित, शिक्षणशास्त्र, पर्यटन प्रशासनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि नाट्यशास्त्राच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा १० फेब्रुवारीपर्यंत सुरू होत्या. त्यांचे निकाल मात्र २३ आणि २४ फेब्रुवारीदरम्यान घोषित करण्यात आले आहेत. सरासरी १३ ते २८ दिवसांत निकाल जाहीर केले.
या आठही विषयांचे मूल्यमापन ऑनस्क्रीनद्वारे केले. त्यामुळे मुदतीच्या आत निकाल जाहीर झाले आहेत. एमएस्सी (संगणकशास्त्र), एमएस्सी (माहिती तंत्रज्ञानशास्त्र), एमएस्सी (वनस्पतीशास्त्र), एमएस्सी (जैवतंत्रज्ञान), एमएस्सी (पदार्थविज्ञान), एमएस्सी (प्राणिशास्त्र), एमएस्सी (पर्यावरणशास्त्र), एमएस्सी (भूगर्भशास्त्र), एमएस्सी (रसायनशास्त्र), एमएस्सी (ड्रग केमिस्ट्री) आदी ११ अभ्यासक्रमांच्या परीक्षा २२ डिसेंबरला सुरू झाल्या होत्या. १२ आणि २२ जानेवारीपर्यंत पेपर सुरू होते. निकाल मात्र काही विषयांचे ९ व २० फेब्रुवारीला घोषित झाले. एमए (मानसशास्त्र), एमए (राज्यशास्त्र), एमए (भूगोल) आणि एमए (विदेशी भाषा) या अभ्यासक्रमांच्या २२ डिसेंबर ते २२ जानेवारी दरम्यान ३० दिवस परीक्षांचे शेड्यूल होते. निकाल २८ दिवसांत म्हणजेच २० फेब्रुवारीला जाहीर केले. एमपीएम, एमएसएस, बीबीए, बीबीए आदी अभ्यासक्रमांच्या २२ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान झालेल्या होत्या. पहिल्या दोन अभ्यासक्रमांचे १ आणि २ फेब्रुवारीला जाहीर केले आहेत, तर बीबीए, बीसीएचे निकाल ७ जानेवारीला जाहीर झाले आहेत.
९० हजार उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन पद्धतीने मूल्यमापन केले व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू झालेल्या होत्या. त्यात विधी, औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकीचा समावेश आहे. या परीक्षा आता संपल्या आहेत. त्यांचे निकालही १० मार्चच्या आत जाहीर केले जाणार आहेत. आम्ही एकूण दीड लाख उत्तरत्रिका स्कॅन केल्या. त्यापैकी ९० हजार उत्तरपत्रिकांचे निकाल ऑनस्क्रीन लावण्यात यशस्वी झालो आहोत. डॉ. गणेश मंझा, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.