आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:एकसारखे हस्ताक्षर असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर, बोर्ड दाखल करणार गुन्हा

छत्रपती संभाजीनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३९४ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखे हस्ताक्षर असल्याच्या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या उत्तरपत्रिका फर्दापूर परिसरातील शिक्षकांकडे तपासण्यास पाठवल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी फर्दापूर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव विजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

३९४ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखे हस्ताक्षर असल्याचा तदर्थ समितीचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसल्याची लेखी उत्तरे विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे दिली. त्यानंतर गुरुवारी त्यांचा निकाल जाहीर केला आहे, अशीही माहिती प्रभारी सचिव जोशी यांनी दिली. बीड, हिंगोली जिल्ह्यांतील भौतिकशास्त्र विषयाच्या ३९४ उत्तरपत्रिकांची तपासणी ही फर्दापूर परिसरातील शिक्षकांकडे होती. त्यामुळे हा प्रकार त्याच परिसरात झालेला असावा, असा निष्कर्ष बोर्डाने काढला आहे. या विद्यार्थ्यांचा बोर्डाकडून गुरुवारी निकाल जाहीर केला. त्यानंतर फर्दापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.