आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रता परीक्षा:शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर, 16 हजार 592 शिक्षक या परीक्षेत पात्र

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी २०२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर केला. यंदा ३ लाख ४३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहेत.२०१९ ची परीक्षा १० जानेवारी २०२० रोजी झाली होती. राज्यभरातून ३ लाख ४३ हजार २४२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.

परीक्षा परिषदेच्या वतीने गेल्या पाच सहा वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षक म्हणून नोकरीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे . यंदा 'टीईटी'च्या पेपर एक साठी (इयत्ता १ली ते ५वी गट), १ लाख ८८ हजार ६८८ पैकी १० हजार ४८७ जण पात्र झाले आहेत. तर पेपर दोन साठी (इयत्ता ६वी ते ८वी गट) १ लाख ५४ हजार ५९६ परीक्षार्थींपैकी ६ हजार १०५ जण पात्र झाले आहेत. आत्तापर्यंतच्या सहा परीक्षांमध्ये राज्यभरातील ८६ हजार २९८ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहेत. जानेवारीत परीक्षा झाल्याने निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा होती परंतु राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रश्नपत्रिकेतील चुका झाल्याने निकालास उशिर झाल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...