आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:104 वर्षीय निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ९७४ ते १९७७ मध्ये ते मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष हाेते.

मराठवाड्याच्या विकासप्रश्नांवर कायम अाग्रही भूमिका घेणारे निवृत्त सनदी अधिकारी, नांदेड जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी भुजंगराव कुलकर्णी (१०४) यांचे बुधवारी निधन झाले. नागरी आरोग्य, जलसंपदा विभागाचे सचिवपदही त्यांनी भूषवले हाेते. निवृत्तीनंतरही त्यांनी मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षापासून विविध पदे भूषवली होती. कुलकर्णी यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९१८ रोजी परळी तालुक्यातील पिंपळगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण अंबाजोगाईत, तर माध्यमिक शिक्षण औरंगाबादेत झाले. १९३४ ते १९३८ दरम्यान त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. त्या वेळी बीएस्सीत हैदरी सुवर्णपदक त्यांना मिळाले हाेते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, आणि नातवंडे असा परिवार आहे. कुलकर्णी यांनी निझामी राजवटीतही १९३९ ते १९५१ दरम्यान प्रशासकीय सेवा केली होती. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत १९५१ ते १९७४ पर्यंत त्यांनी सेवा केली. १९५३ मध्ये ते नांदेडचे पहिले जिल्हाधिकारी झाले हाेते. निवृत्तीनंतर त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी कायम प्रयत्न केले. १९७४ ते १९७७ मध्ये ते मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष हाेते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदही त्यांनी १९८५ मध्ये चार महिने सांभाळले.

बातम्या आणखी आहेत...