आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र पेन्शनर्स संघटनेच्यातर्फे दिला जाणारा निवृत्ती सेवा पुस्कार सोहळा 7 जानेवारी रोजी पैठण येथे होणार आहे., या सोहळ्यात राज्यातील 52 सेवानिवृत्तांना रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते गौरविण्यात येईल, अशी माहिती विभागीय उपाध्यक्ष तथा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या सेवानिवृत्त कार्यकर्त्यांना संघटनेच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत दरवर्षी हा सोहळा पुणे येथेच घेण्यात येत होता., यंदा मात्र संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा पुण्याबाहेर घेण्याचा निर्णय विभागीय उपाध्यक्ष वसंत सबनीस व पैठण तालुका कार्याध्यक्ष देवचंद मोरे यांच्या प्रयत्नामुळे घेण्यात येत आहे.
पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधीजवळील दत्त मंदिराच्या सभागृहात शनिवारी (दि.7) सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्य संघटनेचे अध्यक्ष एन.डी. मारणे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी गौरविण्यात येणाऱ्या 52 सेवानिवृत्तांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 4 सदस्यांचा समावेश आहे. संघटनेचे राज्यभरात एकूण 7 लाख सदस्य असून, जिल्ह्यात सुमारे 7 हजार सदस्य आहेत. या कार्यक्रमाला सुमारे 2 हजार लोक उपस्थित राहतील.,असे सबनीस म्हणाले. पत्रकार परिषदेला सचिव नामदेव घुगे, कार्याध्यक्ष विलास जाधव, प्रकाश कुलकर्णी, रखमाजी जाधव, डॉ. अरविंद देशमुख, जनार्दन अमृतकर आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.