आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:मराठवाड्यातील 'महसूल'च्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या, जनार्दन विधाते छत्रपती संभाजीनगरचे निवासी उप जिल्हाधिकारी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा विभागातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने काढले आहेत. विभागातील एकूण 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तेरा एप्रिलपर्यंत हजर राहा

बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 13 एप्रिलपर्यंत बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास कारवाईच इशारा देखील देण्यात आला आहे.

कोणाची कुठे बदली

जनार्दन विधाते - निवासी उप जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

संगीता चव्हाण - तावदरे - उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड

शेषराव सावरगांवकर - संचालक, मराठवाडा प्रशिक्षण प्रबोधनी, छत्रपती संभाजीनगर

सुधीर चक्कर-पाटील - उप विभागीय अधिकारी, अहमदनगर

माणिक आहेर - उप विभागीय अधिकारी, (शिर्डी, अहमदनगर)

शर्मिला भोसले - उप जिल्हाधिकारी (राहप्र भूसंपादन) नाशिक

नामदेव टिळेकर - उप विभागीय अधिकारी, माळशिरस जि. सोलापूर

अंजली कानडे - पवार - सहायक आयुक्त (मावक) कोकण भवन

मच्छिंद्र सुकटे - निवासी उप जिल्हाधिकारी ,सिंधुदुर्ग

जीवन भगवान देसाई - उप जिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) रायगड

चंद्रकांत सूर्यवंशी - निवासी उप जिल्हाधिकारी

या आहेत सूचना

  • या आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शवण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरुन या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर 13 एप्रिल 2023 ला रुजू होणे अनिवार्य आहे.
  • संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकाला हजर झाले याबाबत ई-मेलद्वारे, टपालाद्वारे शासनाला त्वरीत कळवावे.
  • संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयंतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम 1989 च्या नियम 15 अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार. पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांच्याविरुद्ध शासन निर्णयानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.
  • संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी 13 एप्रिलला रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन" म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करु नये. तसेच, मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचं रजेचे अर्ज स्वीकारु नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.
  • आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास, कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल.