आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौणखनीज उत्खनन करणारे आठ टिप्पर महसुल विभागाने पखडले, भिरडा शिवारातील कारवाई, कागदपत्रांची तपासणी सुरु

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिगोली ते कनेरगाव नाका या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी भिरडा शिवारातून गौण खनीजाचे उत्खनन करणारे आठ टिप्पर महसुल विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ४) ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात आता रॉयल्टी व इतर कागदपत्रांची चौकशी केली जात असून त्यानंतरच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे महसुल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली ते कनेरनगाव नाका तसेच फाळेगाव ते लासीना पाटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. गुजरात येथील एका कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यापुर्वी मुरुम अंथरला जात आहे. यासाठी भिरडा शिवारातून मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. मात्र सदर ठिकाणी केले जाणारे उत्खनन गैरकायदेशीर रित्या असल्याच्या कारणावरून तहसील कार्यालयाच्या पथकाने आज भिरडा शिवारात पाहणी केली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अनिता वडवाळकर, मंडळ अधिकारी खंदारे, पारिसकर, अल्लाबक्ष, तलाठी हर्षवर्धन गवई, वाबळे, प्रदिप इंगोले, सय्यद यांच्यासह सुमारे पंधरा जणांच्या पथकाने आज दुपारी आठ टिप्पर पकडले. या पथकाने सदर टिप्पर तहसील कार्यालयात आणले आहेत. या शिवाय जेसीबी मशीन देखील ताब्यात घेण्याची कारवाई सुरु होती.

दरम्यान, या प्रकरणात आता चौकशी सुरु करण्यात आली असून गौणखनीज उत्खनन करण्यासाठी लागणारी परवानगी, कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधीत कंपनीला नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छोट्या कंत्राटदाराच्या आडून बेकायदेशीररित्या गौणखनीज उत्खनन करून मोठे कंत्राटदार उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जाऊ लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...