आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा हरकती-आक्षेप आले, 14 मार्चला सुनावणी:ग्रामपंचायती, सोसायट्यांची सुधारित प्रारूप यादी प्रसिद्ध

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. हमाल, मापडी, व्यापारी मतदारसंघांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. ग्रामपंचायती व सोसायट्यांची सुधारित यादी २७ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली. ८ मार्चपर्यंत त्यावर हरकती, आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यावर सहा जणांनी नाव बदल आदींबाबत अक्षेप नोंदवला आहे. त्यावर १४ मार्चला सुनावणी होईल.

आक्षेप, हरकती ८ मार्चपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करायच्या होत्या. तीन दिवस पुन्हा यासाठीच वेळ देऊन २० मार्च रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर निवडणुकीचा पुढचा कार्यक्रम जाहीर होईल. बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे शेतकरी, आडत व्यापारी, राजकारण्यांचे लक्ष लागून आहे. गत निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. लकी ड्रॉ झाले होते.

फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेस व भाजपने सत्तेचा उपभोग घेतला. प्रशासकीय काळातही दोन्ही पक्षांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते हे विशेष. अाता बाजार समितीवर झेंडा फडकावण्यासाठी महाविकास आघाडी आणि युतीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...