आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:ग्रामपंचायत हद्दीत हक्काचे घर; शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीची याचिका फेटाळली

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवडगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण नियमित करण्याची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, अनिल पानसरे यांनी फेटाळली. कवडगावचे लक्ष्मण रामा पवार व इतर १२ जण २० ते ३० वर्षांपासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहतात. कवडगाव येथील अशोक पवार, अंकुश खरात यांनी खंडपीठात अॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत याचिका दाखल करून अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली होती. खंडपीठानेही तसे आदेश दिले होते.

त्याची अंमलबजावणी करताना गेवराईच्या तहसीलदारांनी दिलेल्या नोटिसीविरोधात लक्ष्मण रामा पवार व इतरांनी खंडपीठात धाव घेतली होती. अॅड. ठोंबरे यांनी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड सादर केले. लक्ष्मण पवार व इतरांना ग्रामपंचायत हद्दीत हक्काचे घर असतानाही अतिक्रमण केले. जागा बळकावत तेथे कुणीतरी पत्र्याचे घर बांधले, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. हा युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमित करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. अॅड. ठोंबरेंना अॅड. राधिका चौरे-तांदळे यांनी साहाय्य केले. शासनातर्फे सहायक सरकारी वकील अतुल काळे यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...