आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:मराठवाड्यात वाढताेय आकडा 515 काेराेना रुग्ण; राज्यात 6 हजार 971 नवे रुग्ण

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. रविवारी ५१५ रुग्णांची भर पडली, तर आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात एकूण २०८ जण कोराेनामुक्त झाले. सध्या आठही जिल्ह्यांत मिळून २ हजार ७९० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रविवारी औरंगाबादमध्ये २०१, जालना ९६, परभणी २१, हिंगोली १६, नांदेड ६०, लातूर ४४, उस्मानाबाद २४ व बीडमध्ये ५३ नवे रुग्ण आढळले. जालन्यात सर्वाधिक चार मृत्यू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात ३, तर परभणीत एक जण मृत्युमुखी पडला.

पश्चिम विदर्भ हॉटस्पॉट; १,५५२ नवे रुग्ण
पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात रविवारी दिवसभरात कोरोनाचे १५५२ नवे रुग्ण आढळले, तर ६ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी अमरावती जिल्ह्यात ७०९, अकोला ३४२, बुलडाणा ३०१, वाशीम १२५, तर यवतमाळ जिल्ह्यात ७५ नवे रुग्ण आढळले. विभागातील आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८३ हजार ४२३ वर पोहोचली. रविवारी ५०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात ६ हजार ९७१ नवे रुग्ण
मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत ६,९७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. २ हजार ४१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३५ मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात ५२ हजार ९५६ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. २ लाख ४२ हजार ५६३ व्यक्ती होम क्वाॅरंटाइन, तर १,७३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. रुग्णांच्या एकूण संख्येने २१ लाखांचा आकडा पार केला आहे.

बातम्या आणखी आहेत...