आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजय विश्वभारती कॉलनी, चेतक घोडा चौकातील ड्रेनेजची लाइन फुटून घाण पाणी रस्त्यावर येऊन वाहत आहे. वाहन खड्ड्यात आदळते आणि दूषित पाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे परिसरातील नागरिकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते साहेबराव निकम, अनिल कुलकर्णी, किशोर गठडी, अरविंद पाठक यांनी मनपा प्रशासनाला माहिती दिली.
पण त्यांनी, ‘हे काम आमचे नाही, तुम्ही स्मार्ट सिटी प्रशासनाला कळवा,’ असे सांगत जबाबदारी झटकली. फुटलेली ड्रेनेजलाइन दुरुस्त केली नाही. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. मनपा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी येते. मग समस्या सोडवण्यासाठी चालढकल का केली जाते, असा प्रश्नही निकम यांनी उपस्थित केला आहे. फुटलेली ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त केली नाही तर महापालिका तसेच स्मार्ट सिटीवर मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.