आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची दुरावस्था:म्हैसमाळच्या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू ; प्रशांत बंब यांचे पुन्हा एकदा आश्वासन

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मराठवाड्याचे महाबळेश्वर’ असलेल्या म्हैसमाळ या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या १२ किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले होते. शूलीभंजन मंदिराच्या रस्त्याचीही अशीच दुरावस्था आहे. त्यावर स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळा संपताच या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही अनेकदा बंब व इतर लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था काही संपली नाही.

दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देऊन समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वन विभागाच्या काय अडचणी आहेत आणि बांधकाम खात्याला लागणाऱ्या परवानगीचे काय झाले, याबाबत केंद्रेकरांनी चर्चा केली. तसेच वन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या समस्या सोडवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

आमदार प्रशांत बंब यानी सांगितले की, म्हैसमाळच्या रस्त्यासाठी कोरोनाच्या काळात परवानगी मिळाली होती. मात्र कोरोनामुळे हे काम करता आले नाही. आता जी परवानगी मिळाली ती साडेपाच मीटरचीच आहे. मात्र पुढच्या २५ वर्षांच्या विकासाचे आता नियोजन करण्यात आलेले असून त्यामुळे रस्त्यासाठी २४ मीटरच्या परवानगीची गरज आहे. लवकरच ती आम्हाला मिळेल. पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरू होईल. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार आहोत. शूलिभंजन, म्हैसमाळचा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद स्तरावर थांबले शूलिभंजनच्या रस्त्याचे काम अनेक वर्षे झाली शूलिभंजनकडे जाण्यासाठी इथे रस्ता नव्हता. त्यामुळे पर्यटकांना, भाविकांना येण्यासाठी त्रास होता. मी सरकारकडून एक कोटीचा निधी आणला आहे. मात्र अजून वर्कआर्डर झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे फाइल पेंडिंग असल्याची माहिती आहे. मी माझा पाठपुरावा सुरूच ठेवणार असून याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओंना विचारणार आहे, असे आमदार सतीश चव्हाण म्हणाले.

पाच कोटींच्या निधीवरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न शूलिभंजनच्या या सहा किमीच्या रस्त्यासाठी मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. मात्र राज्य सरकारने या निधीला स्थगिती दिली आहे. मी ही स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारकडून या कामासाठी निधी मिळवून रस्त्याचे काम लवकर सुरू कसे करता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

बातम्या आणखी आहेत...