आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गंगाखेड:गंगाखेडच्या घरफोडीतील आरोपी 10 दिवसात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगाखेड शहरातील 10 दिवसांपूर्वी च्या एका घरफोडी च्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचार्‍यांनी फिंगर प्रिंट विभागाच्या मदतीने तपास करीत गुन्हा उघडकीस आणून एका आरोपीस शुक्रवारी (ता.21) अटक केली.

गंगाखेड येथील मन्नाथनगरात दहा ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत एक लाख 94 हजार 650 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. संजय भानुदास केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या घरफोडीचा तपास स्थानिग गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी सुरू केला. त्यांना यात फिंगर प्रिंट विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एन. पठाण यांची मोठी मदत झाली. पठाण यांनी दाखवलेल्या तांत्रिक कौशल्यामुळे आरोपीपर्यंत पोचण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश मिळाले. यावरून आलेवार यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारोखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे यांच्या पथकाने वसमत येथील कारखाना परिसरातील लखन भीमराव एरंडकर या आरोपीस शुक्रवारी ताब्यात घेतले .त्याची चौकशी करून त्यास गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती व्यंकटेश आलेवार यांनी दिली.