आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवी घटना:लकी ड्रॉ लागल्याच्या आमिषाने लुटणारी टोळी शहरात सक्रिय ; वृद्ध महिलेची सोनसाखळी लंपास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मागील महिनाभरात वृद्धांना लकी ड्रॉ लागल्याचे सांगून अंगावरील सोने लंपास करणारी टोळी सक्रिय झाली आहे. गारखेड्यात भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या कांताबाई जैन या ७० वर्षीय वृद्धेला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून एक तोळे सोन्याची साखळी लंपास केली. ही शहरातील पाचवी घटना आहे.

कांताबाई जैन २७ ऑक्टोबaर रोजी सकाळी भाजीमंडीमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून परत येत असताना दुचाकीवरील एका व्यक्तीने त्यांना थांबवले. काय काकू, मजेत का? अशी चौकशी करून तुम्हाला लकी ड्रॉ लागला आहे. त्यात स्कूटी व दीड तोळे सोने बक्षीस लागल्याचे सांगितले. जैन यांनी मी मुलाला फोन करून सांगते असे म्हटल्यावर माझे आधीच बोलणे झाल्याचा दावा त्याने केला. गळ्यातील साखळीचे बिल आपल्याला लागेल, असे सांगून त्याने एका दुकानासमोर नेले. तेथे साखळी मागितली. वृद्धेचा विश्वास बसेल यासाठी दुकानात जाऊन परत आला.

तुम्ही इथे बसा, मी साखळीचे बिल करून आणताे, असे म्हणत दुचाकीवर बसून निघून गेला. बराच वेळ बसूनही तो न आल्याने जैन दुकानात गेल्या. तेव्हा ते प्लायवूडचे दुकान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मुलाला संपर्क करून घटना कळवली. सोमवारी त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वी टीव्ही सेंटर, हर्सूलमध्ये याच पद्धतीने वृद्धांचे सोने लुटल्याच्या घटना महिनाभरात घडल्या.

बातम्या आणखी आहेत...