आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:क्वॉरंटाइन केलेल्या कुटूंबियांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, सोन्यासह रोकड लंपास

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गजानन नगरातील क्वॉरंटाइन केलेल्या कुटूंबियांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मंगळवारी (दि. 18) उघड़कीस आली. सोन्याच्या वस्तुंसह नगदी रक्कम असा एक लाख १४१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

गजानन नगरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य विभागाने कुटुंबातील सर्वच सदस्यांना क्वारंटाईन केले. त्यामुळे घरास कुलूप होते. हीच संधी साधत चोरट्यानी डल्ला मारला. मंगळवारी क्वारंटाईन झालेले कुटूंबिय घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. नवामोंढा पोलिस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दि. ११ ते १८ ऑगस्ट या काळात आपल्यासह कुटूंबिय शासकीय रुग्णालयात उपचार घेत होतो. घरात कुणीही नसल्याने घरास कुलूप होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रुपये चोरून नेल्याचे म्हटले. कपाटात ठेवलेला सोन्याचा नेकलेस, दोन अंगठ्या, कानातील झुंबर, गंठण आदी एक लाख आठ हजार रुपयांचा ऐवज व नगदी ३३हजार रुपये चोरट्यांनी चोरल्याचे नमूद केले आहे.घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रामेश्व तट व फौजदार सुनील पल्लेवाड यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली.