आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:कॉरंटाईन केलेल्या कुटूंबियांच्या घरातून 20 लाखाचा ऐवज लंपास

परभणी3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक

शहरातील जिंतूर रस्त्यावरील शालीमार फंक्शन हॉलजवळील रहेमतनगरातील कॉरंटाइन केलेल्या कुटूंबियांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करत 19 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.26) रात्री उघकीस आली. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहेमतनगरातील एक जण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर इतर नातेवाईक हे कुटूंबासह 24 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास शेजारीच राहत असलेल्या नातेवाईकाकडे होमकॉरंटाईन झाले होते. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास होम कॉरंटाईन व्यक्ती घरी आल्या असता त्यांना घर उघडे असल्याचे दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला त्यावेळी स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. घरातील लोखंडी तिजोरीतील रोखरकमेसह सोन्या-चांदीच्या वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, फौजदार साईनाथ पुयड हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

नानलपेठ पोलिस ठाण्यात कुटूंबियांनी चोरीची तक्रार दाखल केली. या तक्रारीत आपण 24 ते 26 ऑगस्ट या काळात घरास कुलूप लावून बाहेर गेलो होतो. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत लोखंडी तिजोरीतील नगदी दहा लाख रुपये व नऊ लाख 91 हजार रुपये किंमतीचे सोन्या -चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे म्हटले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास फौजदार साईनाथ पुयड हे करीत आहेत.