आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळच्या मान्यतेने हौशी आट्यापाट्या असोसिएशन शेगावच्या वतीने १८ ते २० मे २०२२ या कालावधीत शेगाव जिल्हा बुलढाणा येथे ३५ वी पुरुष व ३० वी महिला सिनिअर आट्यापाट्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात वाशीम संघा विरुद्ध औरंगाबाद संघाला अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानवे लागले होते.
आता पद्दुचेरी येथे दि. ०८ जून ते १२ जून २०२२ रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असुन यासाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. यात औरंगाबाद जिल्हा संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडू रोहन काळे आणि अश्विन खुडसाने यांना स्थान देण्यात आले आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून डॉ. दीपक कविश्वर, डॉ. अमरकांत चकोले, जय कवीश्वर, सुनिल डावकर,उद्योगपती राजकुमार मुंब्रे,सतिश इंगळे,धर्मेंद्र काळे,नीरज मगरे,दिलीप जाधव,रमेश प्रधान,मनोज बनकर,अनिल मोटे,लतेश मगरे सागर सोनवणे,सुरेश त्रिभुवन,आकाश सरदार,अमरदीप नवगिरे,जयवर्धन इंगळे,संकेत बोन्गार्गे,अनिल वाघमारे, निलेश भगत,शंकर गायकवाड,साईनाथ सोनावणे,संतोष जाधव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.