आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीचे भूत मोठे...!:विठ्ठल वारीच्या अफलातून फोटोंनी रोहित पवारांना घातली भुरळ; देहभान विसरायला लावणारे क्लिक पाहाच

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूरचा विठ्ठल उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यापुढे सारेच लीन होतात. त्याच्या वारीचा महिला वर्णावा किती. या वारीचे अफलातून फोटो एका चित्रकाराने टिपले. त्या फोटोंची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना भुरळ पडली.

पंढरपूर भेटीत रोहित पवार यांनी या छायाचित्रकाराची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गोडसे असे त्यांचे नाव आहे. त्यांचे फोटोही रोहित पवार यांनी पोस्ट केलेत. हे फोटो देहभान विसरायला लावतात. संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे...

पंढरीचे भूत मोठे |
आल्या गेल्या झडपी वाटे ||
बहु खेचरीचे रान |
बघ हे वेडे होय मन ||
जाऊ नका कोणी |
तिथे जाऊ नका कोणी |
जे गेले, नाही आले परतोनी
तुका पंढरीसी गेला |
पुन्हा जन्मा नाही आला ||

पंढरपूरच्या विठोबाचे वेड आहेच असे. त्यामुळे आषाढी वारीला त्याच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा पंढरीत जमतो. तो जाती, धर्माच्या भिंती पाडून टाकतो. या विठ्ठलाच्या वारीचे हे मनोहारी फोटो पाहाच.

बातम्या आणखी आहेत...