आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातेत नेऊन तिथली निवडणुक जिंकली. मग, कर्नाटकमध्ये सीमेवरील वाद उफाळून काढला आणि त्या निवडणुका खिशात घातल्या. महाराष्ट्राचा वापर करुन निवडणुका जिंकल्या जात आहेत असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला.
महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या कार्यक्रमानिमित्ताने औरंगाबादमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संत तुकारामांचा मुद्दा काढला
रोहित पवार इशारा देत म्हणाले, आता मध्यप्रदेशात संत तुकारामांचा मुद्दा उपस्थित झाला, पण एकही जण 'ब्र' शब्द काढत नाहीत, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.
चुकीच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत
राेहित पवार म्हणाले, गेल्या काही दिवसात देशात झालेल्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्याचा वापर झाला, पण कुणालाच या बाबी लक्षात येत नाही. राज्यातील महापुरुषांबाबत चुकीचे वक्तव्य केले जातात आणि त्याबद्दल कुणीही दखल घेत नाही, ही बाब भविष्यात घातक ठरेल.
विधानसभेला शिस्त उरली नाही
राेहित पवार म्हणाले, विधानसभेत पुर्वी चर्चेनंतर आश्वासन दिले जायचे आणि नंतर त्यावर बैठका होऊन प्रश्न मार्गी लावले जात होते. आता असे होताना दिसत नाही. बातम्या आणि व्हिडीओंपुरते प्रश्न मांडले जातात. विधानसभेची शिस्त आता उरलेली नाही. अर्थकारणाभोवती राजकारण उरलेले आहे. जनतेच्या प्रश्नांपासून दूर गेले आहेत. यामुळे आगामी काळात सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्ती राजकारणात येणार नाहीत. हे या देशासाठी घातक ठरेल.
गत 10 वर्षांत राज्यात काहीच झाले नाही..
राेहित पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याने मागील काळात घेतलेले धोरणात्मक निर्णय नंतर देशाने स्विकारले आहेत. पण अलिकडील 10 वर्षांच्या काळात जनहिताचे मुद्दे उचलणे आणि मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना झालेली नाही.यामध्ये सर्वच सरकारांना आत्मचिंतन-मंथन करण्याची गरज आहे, याकडेही रोहित यांनी लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.