आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदेसेनेचे मंत्री संदिपान भुमरे (पैठण) यांच्या विवाहित कन्या प्रेरणा प्रतापसिंह पंडित या दैठणा (जि. बीड) येथे राष्ट्रवादीच्या तिकिटावर सरपंचपदी विजयी. अमरसिंह पंडित गटाची सरशी.
संगमनेर तालुक्यात निळवंडे गावच्या सरपंचपदी इंदोरीकर महाराजांच्या सासू शशिकला पवार. त्या अपक्ष उमेदवार होत्या.
कोल्हापूरच्या वरेवाडी गावात आनंदा रामचंद्र भोसले हा भाजी विक्रेता उद्धवसेनेकडून सरपंचपदी विजयी झाला. तो पत्रकारितेचा पदवीधरही आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात काँग्रेसचा विजय.
कागणीत (जि. कोल्हापूर) वॉर्ड २ मध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक मते. म्हणून दुसऱ्या क्रमांकाच्या शीतल कोरे विजयी घोषित.
जॉर्जियात वैद्यकीय शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंह शिंदे सांगली जिल्ह्यातील वड्डी गावात सरपंचपदी निवडून आली.
जळगावच्या टाकळी खुर्द (ता. जामनेर) येथे विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत बेशुद्ध पडलेला भाजप कार्यकर्ता धनराज श्रीराम माळी (२५) याचा उपचारादरम्यान मृत्यू. याच मिरवणुकीवर दगडफेकीत तीन जण जखमी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.