आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाणा विमानतळावर नऊ वर्षे सात महिने सेवा देणारा कॉकर स्पेनिअल जातीचा के-९ सैनिक रोमिओ श्वास शुक्रवारी (३ जून) सेवानिवृत्त झाला. विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कर्मचाऱ्यांनी या श्वानाला निरोप दिला. त्याचा सांभाळ करणाऱ्या जवानाला लळा लागल्याने त्याने रीतसर कायदेशीर करार करून त्याला दत्तक घेतले. चिकलठाणा विमानतळाच्या सुरक्षेसाठी रोमिओची नियुक्ती झाली होती. त्याचा मालकी हक्क विमानपत्तन प्राधिकरणाकडे असून त्याला हाताळण्याचे काम सीआयएसएफद्वारे केले जाते. विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्याचे काम रोमिओकडे होते. त्याने नऊ वर्षे अत्यंत चोखपणे सेवा बजावल्यामुळे विमानतळावर कुठेही अनुचित घटना घडली नाही. कॉकर स्पेनिअल जातीच्या श्वानाला इतर श्वानांच्या तुलनेत गंधज्ञान अधिक असते. अमली पदार्थ, विस्फोटक, दारूगोळा, हत्यारे आदींचा तपास लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विमानतळ सुरक्षा विभागाकडून श्वानाला दर्जेदार खुराक, निवासासाठी वातानुकूलित कक्ष उपलब्ध करून दिला जातो. दर महिन्याला डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाते. एका विशिष्ट वयानंतर त्याला निवृत्त केले जाते. रोमिओच्या निरोप समारंभाला विमानपत्तन निदेशक डी. जी. साळवे, सीआयएसएफ डेप्युटी कमांडंट पवनकुमार, सीएसओ अविनाश रंजन उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.