आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:जि.प.शिक्षण विभागाचे छत पडण्याच्या मार्गावर, कर्मचाऱ्यांचे जीव मुठीत धरून काम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंरगाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे छत कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता असून, येथील अधिकारी-कर्मचारी दररोज जीव मुठीत धरून काम करीत आहेत.

एकीकडे कोरोनाची भीती असताना दुसरीकडे जि.प.च्या दुर्लक्षामुळे कर्मचारी अडचणीत आले निर्माण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेची इमारत अतिशय जुनी झालेली आहे. गेल्या वर्षी अध्यक्षांच्या दालनाचे, छताचे प्लास्टर पडल्याने धावपळ उडाली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागे टीनपत्र्यामध्ये शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत, आरोग्य विभाग आहेत. यातील काही विभागांनी डागडुजी करून घेतली. परंतु शिक्षण विभागाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाचेही तीनतेरा वाजलेले असून, विस्तार अधिकाऱ्यांचे दालन व कर्मचारी ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणचे लाकडी छत कुठल्याही क्षणी कोसळू शकते. या ठिकाणी दररोज कर्मचारी बसतात. परंतु कुठल्याही क्षणी हे छत डोक्यावर पडू शकते. या भीतीमुळे कर्मचारी हैराण झालेले आहेत.

त्यांचे दालन मात्र चकाचक

जिल्हा परिषदेच्या इतर विभागांच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांची दालने चकाचक होत असताना शिक्षण विभागाची अतिशय दुरवस्था झालेली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातील छत कुठल्याही क्षणी कोसळू शकते. हे संपूर्ण विभागच धोक्यात आलेले असताना जि.प. बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. कोरोनाची भीती असताना आम्ही जीव मुठीत धरून ड्यूटीवर येतो. असे असताना संपूर्ण छतच कधीही पडू शकते आणि आमच्या जीविताला धोका होऊ शकतो. याकडे कोणीतरी लक्ष देणार आहे का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.