आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:रोटरीचे गव्हर्नर शिक्षण, युवांंसाठी काम करणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरीमध्ये अत्यंत सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदावर औरंगाबाद येथील रोटरियन रुक्मेश जखोटिया यांची निवड झाली. त्यांचा पदग्रहण सोहळा तापडिया नाट्यमंदिरात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डायरेक्टर महेश कोटबागी उपस्थित होते.

मागील वर्षाचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपावळे यांनी गव्हर्नरपदाचे सूत्र रुक्मेश जखोटिया यांना सोपवली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मराठवाड्यातील आठ जिल्हे, सातारा, सोलापूर, अहमदनगर अशा एकूण ११ जिल्ह्यांचा कारभार जखोटिया यांच्याकडे असेल.

पर्यावरण, जलसंवर्धन, स्वच्छता, पाणी, साक्षरता, आर्थिक विकास, महिला सबलीकरण, शांतता, समभाव, शिक्षण, तरुण रोटरीयनला सपोर्ट, महिलांचा सहभाग या प्रमुख बाबींवर काम करणार असल्याचे जखोटिया म्हणाले. या वेळी रोटरी क्लब औरंगाबाद ईस्टच्या अध्यक्षपदी संगीता तांबट व सचिवपदी संदीप पानखडे यांचाही पदग्रहण सोहळा झाला. अध्यक्ष राजेश शर्मा व सचिव नवल होलानी यांनी त्यांना सूत्रे दिली.

बातम्या आणखी आहेत...