आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिनाभरापासून सर्वत्र इन्फ्लूएंझा ए एच ३ एन २ चा संसर्ग वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या लक्षणांनी अवघे शहर बेजार आहे. तरीही मनपाच्या आरोग्य विभागाने ठाेस पाऊल उचलले नाही. अाता उशिरा का हाेईना, २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. सर्व खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती चाेवीस तासांच्या आत मनपाला कळवावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात संशयित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र प्रत्येक रुग्ण फ्लू ए एच-३ एन-२ नसतो. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. इन्फल्यूएंझा ए एच-३ एन-२ हा आजार विषाणूमुळे होतो. ताे संसर्गजन्य असून एका माणसापासून दुसऱ्याला होतो.
मास्कचा वापर करा, हात धुवा ताप, घसादुखी, खोकला, नाक गळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवा, खोकताना व शिकताना हातरुमाल वा कपड्याने तोंड झाकून घ्या. नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवा. इन्फल्यूएंझाची लक्षणे असलेल्यांपासून लांब राहा. पौष्टिक आहार घ्या व भरपूर पाणी प्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढवा. पुरेशी झोप व विश्रांती घ्या, धूम्रपान टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, हस्तांदोलन टाळा, फ्लूसदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घ्या पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती महिला, मधुमेहामुळे स्थूलत्व आलेले रुग्ण, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगी, चेतासंस्थेचे विकार, फुप्फुस, यकृत मूत्रपिंडचे आजार असणाऱ्या व्यक्ती, दीर्घकाळ स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.