आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाव भोवली:​​​​​​​हुंड्यात दहा लाख रुपये, कासव, लॅब्रेडॉरची मागणी; लग्न मोडले; मुलीने धाडसाने दिला लोभी तरुणाला नकार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकच्या कुटुंबीयांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल

कायद्यानुसार गुन्हा असला तरी आजही समाजात विवाह जुळवताना हुंड्याची सर्रास मागणी केली जाते. पूर्वी ताे पैसे, दागिन्यांच्या स्वरूपात हाेता, आता ताे महागड्या वस्तूंच्या रूपाने मागितला जाताे. मात्र नाशिकच्या एका नवरदेवाने व त्याच्या कुटुंबीयांनी औरंगाबादच्या वधूपित्याकडे चक्क दहा लाख रुपयांसह एकवीस नखी जिवंत कासव, लॅब्रेडॉर जातीचा काळ्या रंगाचा कुत्रा व एक समई अशा ‘एेवजा’ची मागणी केली. हे एेकून मुलीच्या घरच्यांना धक्काच बसला.

सासरकडच्या मंडळींकडून हाेणाऱ्या अशा विचित्र मागण्यांना भीक न घालता औरंगाबादच्या नियाेजित वधूने अशा तरुणाशी लग्नच न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे साखरपुड्यानंतर हे लग्न माेडले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून नाशिकच्या कुटुंबाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमानगरातील व्यावसायिकाच्या मुलीचा विवाह फेब्रुवारी २०२१ मध्ये नाशिक रोडवरील डायमंड कॉलनीत राहणाऱ्या चराटे कुटुंबातील तरुणासाेबत ठरला होता.

साखरपुडादेखील पार पडला. तेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलाला २ लाख ११ हजार रुपये किमतीची अंगठी दिली हाेती. परंतु काही दिवसांनी चराटे कुटुंबाकडून मागण्या वाढू लागल्या. तुमच्या मुलीला नोकरीला लावतो म्हणून त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांकडे आणखी पैशांचा तगादा लावला. रवींद्र चराटे, आकाश चराटे यांच्यासह इतर तीन महिलांनी दहा लाख रुपये मागितले.

तसेच मागणी पूर्ण हाेत नसल्याने चराटे कुटुंबाने लग्नाला नकार दिला. या प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे मुलीच्या वडिलांनी उस्मानपुरा पोलिसात ठाण्यात धाव घेऊन चराटे कुटुंबीयांविराेधात तक्रार दाखल केली. पाेलिस निरीक्षक दिलीप तारे यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

मुलीने धाडसाने दिला लोभी तरुणाला नकार
मुलाच्या कुटुंबीयांनी पैशाशिवाय इतर वस्तूंच्या केलेल्या मागण्या एेकून मुलीकडील कुटुंबीयांना धक्काच बसला. चराटे कुटुंबीयांनी चक्क एकवीस नखी जिवंत कासव, काळ्या रंगाचा लॅब्रो डॉग व समईची मागणी केली. या लाेभी कुटुंबाबद्दल मुलीने संताप व्यक्त करून अशा मुलाशी लग्नच करायचे नाही, असा निर्धार तिने कुटुंबीयांकडे बाेलून दाखवला. कुटुंबीयही मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकत नसल्याचे त्यांनी चराटेंना कळवले.

बातम्या आणखी आहेत...