आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:विज ग्राहकांकडे तब्बल 1259 कोटी रुपयांची थकबाकी, वसुली मोहिमेमध्ये अनेकांना विज कंपनीचा शॉक बसणार

हिंगोली6 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली मंडळामध्ये विज ग्राहकांकडे विज कंपनीची तब्बल १२५९ कोटी रुपयांची थकबाकी असून पुढील काही दिवसांतच सुरु होणाऱ्या वसुली मोहिमेमुळे अनेक थकबाकीदारांना विज कंपनीचा शॉक बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत हे पाच तालुके आहेत. यामध्ये कृषी, औैद्योगिक, वाणिज्य व घरगुती विज ग्राहकांची संख्या सुमारे १. ४० लाख एवढी आहे. या शिवाय पालिकेचे पथदिवे, शहरी व ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. विज कंपनीकडून दरवर्षी थकबाकी वसुली मोहिम राबविली जाते. मात्र या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने विज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा दिवसें दिवस वाढू लागला आहे.

दरम्यान, डिसेंबर अखेरच्या स्थितीमध्ये हिंगोली मंडळात डिसेंबर औद्योगिक वीजग्राहकांकडे ५७.७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या सोबतच कृपीपंप विज ग्राहकांकडे १०७५.३४ कोटी रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १७.७१ कोटी, पथदिव्यां पोटी १०६.८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सदर सर्व थकबाकीची रक्कम १२५९.१८ कोटी रुपये आहे.

दरम्यान, आता थकबाकी वसुलीसाठी मंडळातील सर्व अधिकाऱ्यांना मोहिम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. थकबाकीदार विज ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हिंगोली जिल्हयात विज कंपनीकडून लवकरच विज देयकांची चालु तसेच थकबाकीची रक्कम वसुली मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...