आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत गुटखा खाकून थुंकल्यास 200 रुपये दंड:अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोडांचे आदेश; आजपासून कारवाई सुरू

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे सर्वत्र पाहायला मिळते. अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी घाटीतल्या अपघात विभागात भेट दिल्यानंतर पहिल्याच भेटीत त्यांना मोठ्या प्रमाणात सर्वत्र गुटखा तंबाखू खावून थुकल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे घाटीत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकावर आता अशा प्रकारे थुंकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशच राठोड यांनी दिले आहेत. त्यानंतर घाटीत रविवारपासून या कारवाईला देखील सुरुवात झाली आहे.

घाटी मध्ये दवाखान्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पाहायला मिळते दररोजगाठीत ओपीडीचे निमित्ताने 2000 रुग्ण दाखल होतात यामुळे त्यांचे नातेवाईक आणि मित्र अशी जवळपास पाच ते सात हजार लोक दररोज घाटी परिसरात असतात. रुग्णाला भेटायला जाताना अपघात विभाग तसेच इतर विभागात लिफ्ट पासून ते खिडक्यांपर्यंत सर्वत्र गुटखा तंबाखू खाऊन थुकल्याचे चित्र पाहायला मिळते.

दोनशे रुपये दंडाची कारवाई होणार

घाटी मध्ये यापूर्वी तंबाखू आणि गुटखा खाणाऱ्यांवरती प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती .मात्र ही कारवाई काही दिवसापूर्वीच मर्यादा राहिली होती. मात्र आता अधिष्ठाता राठोड यांनी यासाठी सुरक्षारक्षकांना कारवाईचे आदेश दिले असून या प्रकरणात दोनशे रुपये दंड ठरवण्यात येणार असल्याचे उपवैद्यकीय अधीक्षक विकास राठोड यांनी सांगितले.त्यासाठी सर्व सुरक्षा रक्षकांना सूचना देखील देण्यात आले असून रविवारी या प्रकरणात कारवाई देखील करण्यात आल्याचे विकास राठोड यांनी सांगितले सोमवारपासून या आदेशाची आणखी तीव्रपणे अंमलबजावणी केली जाणार आहे

तर घाटी स्वच्छ दिसेल

घाटी स्वच्छतेचे बाबतीमध्ये अनेकदा उपाय योजना राबवल्या जातात, मात्र त्यामध्ये सातत्य राहत नाही त्यामुळे काही दिवसापूर्वी घाटी स्वच्छ होते मात्र पुन्हा सर्वत्र अस्वच्छता पाहायला मिळते त्यामुळे नव्याने अशा पद्धतीची कारवाई सुरू ठेवून सातत्य ठेवले तर लोकांना देखील शिस्त लागून घाटीमध्ये गुटखा खाऊन तंबाखू खाऊन थुकणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...