आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कांदा ७.८७ लाख हेक्टरवर असूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा विधिमंडळात पोहोचली. त्यांच्यासाठी अनुदान जाहीर झाले. मात्र, त्याहून अधिक म्हणजे ४२ लाख हेक्टरवर असलेल्या कापसाच्या पदरी अजूनही निराशा आली आहे. कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ७० टक्के कापूस घरातच ठेवला आहे. यंदा मराठवाड्यात दीडशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने नुकसान झालेल्या धानाला, कांद्याला केलेल्या मदतीप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही किमान प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने मराठवाड्यातील नेतेही गप्प आहेत आणि सरकारही चुप्प. मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मराठवाड्यात साडेबारा लाख हेक्टरवर पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची लागवड आहे. कापसाच्या पडलेल्या भावामुळंे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून कापूस साठवून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना किडे चावून त्वचेचे आजार होत आहेत. कापूस एकाधिकार योजनेत कापसाला ५०० रुपये बोनस देऊन खरेदी केली जात होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मनोहर जोशी यांच्या काळात हा बोनस देण्यात आला होता. त्याच धर्तीवर कापसाला बोनस देण्याची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. कापूस हे कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक आहे. त्यामुळे कोरडवाह़ू शेतकरी खरिपात हे पीक घेतल्यानंतर त्यावरच उदरनिर्वाह करतो. मात्र कापसाला भाव मिळत नसल्यामुळे राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्याच होत आहेत.
किमान एक हजार रुपये बोनस द्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सरकारच्या धोरणामुळे झाले आहे. त्यामुळे किमान एक हजार बोनस कापसाला प्रतिक्विंटल द्यायला हवा. लोकप्रतिनिधी कापसावर बोलत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या तालुक्यातील आमदारांना कापसावर काय बोलले याचा जाब विचारायला हवा. - अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष कापूस उत्पादकांनी काय पाप केले? सरकारने धान-कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली, मग कापूस उत्पादकांनी काय पाप केले? बारा हजार रुपये क्विंटल असलेला कापूस सात हजारांवर आला आहे. त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिक्विंटल मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी. - कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
किमान दोन हजार रुपये बोनस द्या कापूस एकाधिकार योजनेत जसा बोनस दिला जात होता तसा क्विंटलमागे दोन हजार रुपये बोनस देण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान भरून निघेल. - विजय जावंधिया , कृषी अभ्यासक किमान दोन हजार रुपये बोनस द्या कापूस एकाधिकार योजनेत जसा बोनस दिला जात होता तसा क्विंटलमागे दोन हजार रुपये बोनस देण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान भरून निघेल. - विजय जावंधिया , कृषी अभ्यासक किमान एक हजार रुपये बोनस द्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सरकारच्या धोरणामुळे झाले आहे. त्यामुळे किमान एक हजार बोनस कापसाला प्रतिक्विंटल द्यायला हवा. लोकप्रतिनिधी कापसावर बोलत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या तालुक्यातील आमदारांना कापसावर काय बोलले याचा जाब विचारायला हवा. - अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
कापूस उत्पादकांनी काय पाप केले? सरकारने धान-कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली, मग कापूस उत्पादकांनी काय पाप केले? बारा हजार रुपये क्विंटल असलेला कापूस सात हजारांवर आला आहे. त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिक्विंटल मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी. - कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
मराठवाड्यात १५० वर शेतकरी आत्महत्या हमीभाव आणि वाढता उत्पादन खर्च अडचण कापसाचा हमीभाव ६३०० इतका आहे. कापसाचा भाव डिसेंबर २०२२ अखेर ९६०० रुपये प्रतिक्विंटल इतका होता, तर २०२१ मध्ये कापसाचा भाव बारा हजार इतका गेला होता. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात ९६०० पेक्षा अधिक भाव मिळेल यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र कापसाचे भाव सातत्याने कोसळत असून ७६०० प्रतिक्विंटल अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे तीन महिन्यांतच दोन हजार रुपयांनी कापसाचे भाव कोसळले आहेत. कापूस आयात केल्यामुळे देशातील भाव पडल्याचा आरोप केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.