आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:तीन एटीएममध्ये छेडछाड करून 46500 रुपये लांबविले, तीन चोरट्यांची सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध सुरु

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन एटीएम मध्ये छेडछाड करून ४६५०० रुपये पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन चोरट्यां विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १९ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आता सीसीटीव्ही फुजेटवरून चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील देवडानगर, चित्रा कलर लॅब व मोंढा भागात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी शुक्रवारी ता. १८ दोन ते तीन चोरट्यांनी एटीएममध्ये जाऊन काही रक्कम काढली. त्यानंतर ज्या ठिकाणावरून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी रॉड टाकून पैसे असलेेला ट्रे अडकवून ठेवला त्या ट्रेमध्ये असलेली रक्कम हात घालून काढून घेतली. यामध्ये तीन एटीएममधून एकूण ४६५०० रुपये चोरट्यांनी पळविले.

या एटीएम मशीनच्या दुरुस्तीची सेवा देणारे अंकुश हुलेकर यांच्या भ्रमणध्वनीवर मशीन नादुरुस्त झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यांनी हिंगोलीच्या कर्मचाऱ्यांची संपर्क करून पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून हिंगोलीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता मशीन नादुरुस्त असल्याचे सांगितले. त्यावरून हुलेकर यांनी हिगोली येथे भेट देऊन पाहणी केली. यामध्ये एटीएम मशीनचे काही भाग डॅमेज झालेले दिसले. त्यामुळे एटीएम मशीनला छेडछाड झाल्याच्या संशयावरून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन ते तीन इसम एटीएम मशीन सोबत छेडछाड करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर हुलेकर यांनी शनिवारी ता. १९ रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आता सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेकर, जमादार जाधव, शेख शकील, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, दिलीप बांगर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे.

चौकटीचा मजकूर

लाखो रुपयांची रक्कम सुरक्षीत

यामध्ये चोरट्यांनी काही रक्कम काढून त्या ठिकाणी रॉड टाकून पैशाचा ट्रे अडकवून ठेवला अन त्यातील रक्कम काढून घेतली. मात्र इतर ट्रे खालीच असल्याने ट्रेमधील लाखो रुपयांची रक्कम सुरक्षीत राहिली. यामध्ये चोरट्यांनी देवडानगर एटीएममधून १६ हजार रुपये काढले या ठिकाणी ३७ लाख रुपये होते, चित्रा लॅब जवळील एटीएम मधून १६ हजार रुपये काढले त्या ठिकाणी २६.४१ लाख रुपये तर मोंढ्यातील एटीएम मधून १४५०० रुपये काढले त्या ठिकाणी १८.६४ लाख रुपये होते. पैशाने भरलेला एकच ट्रे वर आल्यामुळे इतर ट्रे मधील रक्कम सुरक्षीत राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...