आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असून, प्रवेशासाठीचा ड्रॉ बुधवारी काढण्यात आला. या ड्रॉ नंतर आता जिल्हानिहाय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १२ एप्रिल पासून मोबाईलवर संदेश पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांनी प्रवेश निश्चितीची प्रक्रिया करायची असून, यंदा या प्रवेशासाठी ३३५ जणांनी डबल अर्ज भरले होते. ते बाद ठरवून एकच अर्ज गृहित धरण्यात आला आहे. तर विशेष म्हणजे ५८ अर्ज हे पडताळणी दरम्यान जुळ्यांचे असल्याचे समोेर आले आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षणाचा मोफत अधिकार मिळावा. यासाठी सक्तीचा मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ करण्यात आला. या अंतर्गत खासगी शाळंामध्ये २५ टक्के जागावर प्रवेश देण्यात येता. फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शिक्षण संस्थंाच्या नोंदणीनंतर मार्च महिन्यात पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ही मुदत ३१ मार्च रोजी संपल्यानंतर बुधवार दि. ५ एप्रिल रोजी प्रवेशासाठी सोडत (ड्रॉ ) ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आला. यानंतर आता सर्व जिल्हयांमधील प्राप्त अर्जांपैकी किती जण प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. याचे संदेश पालकांना मोबाईलवर १२ एप्रिल पासून पाठविण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा या प्रवेश प्रक्रियेत ५४७ शाळा पात्र असून, प्रवेश क्षमता ४०७३ आहे. यासाठी एकूण २० हजार ७७९ जणांचे अर्ज आले आहे. प्राप्त अर्जांच्या झालेल्या छाननीमध्ये ३३५ जणांनी प्रवेशाच्या अपेक्षेने नाव आणि जन्मतारखेत बदल करत डबल अर्ज भरल्याचे आढळून आले.
त्यांचे दोन अर्ज बाद ठरवून फक्त एकच अधिकृत अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. तर ५८ अर्जांमध्ये वडिलांचे नाव आणि अडनाव, जन्म तारीख, पत्ता एकसारखा आला असल्याने शिक्षण विभागाने नेमलेल्या पडताळणी समिती अंतर्गत चौकशी केली असता ते अर्ज जुळ्यांचे असल्याचे समोर आले आहे. पालकांनी आलेल्या संदेशानंतर मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा. दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास प्रवेश प्रक्रियेतून अर्जदार बाद ठरले असेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात दोन पडताळणी केंद्र
प्रवेशासाठी पालकांना संदेश आल्यावर त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. यासाठी शहरात सिडको एन 6 मधील तेरणा आणि उस्मानपुरा येथील मनपा शाळा येथे पडताळणी केंद्र नेमण्यात आले आहे. जिथे पडताळणी समिती तपासणी करेल. तसेच काही त्रुटी आढळून आल्यास गटशिक्षणाधिकारी चौकशी करुन प्रवेश नाकारु देखील शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.