आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळांच्या नोंदणी प्रक्रियेनंतर आरटीई प्रवेशासाठी पालकांची नोंदणी प्रक्रिया कधी सुरु होणार या प्रतिक्षेत असलेल्या पालकांची चिंता आता दूर झाली असून, आरटीई शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठीची विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेस बुधवारी दुपारी 3 नंतर सुरुवात झाली आहे. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. ही प्रक्रिया फेब्रुवारी मध्ये सुरु करण्यात आली. सुरुवातीला 10 फेब्रुवारीपर्यंत शाळांना नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यावर पालकांसाठीची प्रक्रिया होईल अशी अपेक्षा होती. परंतु यंदा तांत्रिक अडचणीमुळे पालकांसाठीची नोंदणी प्रक्रिया उशीरा सुरु झाली असून अर्ज प्रक्रियेसाठी 17 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसेल. तथापि, पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
यंदा जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत 547 शाळांनी नोंदणी केली असून, त्यात 4 हजार 70 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही. ऑनलाइन भरलेली माहिती चुकीची असणार नाही, याची पालकांनी काळजी घ्यावी. प्रवेशावेळी नव्हे; पण प्रवेशानंतर काही दिवसांनी संबंधित मुलाला आधार कार्ड त्या शाळेत जमा करावेच लागेल. आधार कार्ड न दिल्यास काही दिवसांनी प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी प्रवेशित मुलाचे आधार कार्ड वेळेतच काढून ठेवणे आवश्यक आहे. असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
पालकांसाठी महत्त्वाचे असा भरा अर्ज
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या शासकीय वेबसाइटवरून अर्ज करावा. प्रथम विद्यार्थ्याची नोंदणी करा, पुन्हा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्डने लॉगिन करावे. विद्यार्थ्याची मूळ माहिती भरून अर्जातील सर्व माहिती भरावी. अर्जातील माहिती भरून झाल्यावर शाळेची निवड करावी, अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलइन लॉट्रीनेच प्रवेश
प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण म्हणाल्या की, आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येईल. त्याचे मॅसेज पालकांना जातील. पालकांनी कोणत्याही व्यक्तीच्या अमिषाला बळी पडू नये. ऑनलाइन पद्धतीने पार पडणारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. कागदपत्रांची छाननी करूनच प्रवेश दिला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.