आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांची प्रतीक्षा संपली:आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, जिल्ह्यात 4070 जागा

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा, ५४७ शाळा

शाळांच्या नोंदणी प्रक्रियेनंतर आरटीई प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होईल या प्रतीक्षेत असलेल्या पालकांची चिंता आता दूर झाली असून, आरटीई शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीच्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेस बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर सुरुवात झाली. १७ मार्चपर्यंत अर्जासाठी मुदत दिली आहे.

यंदा जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत ५४७ शाळांनी नोंदणी केली असून त्यात ४०७० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. सुरुवातीला १० फेब्रुवारीपर्यंत शाळांना नोंदणीसाठी मुदत दिली हाेती. ही मुदत संपल्यावर पालकांसाठीची प्रक्रिया होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी प्रक्रिया उशिरा सुरू झाली. प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसेल. मात्र, प्रवेशानंतर काही दिवसांनी आधार कार्ड त्या शाळेत जमा करावे लागेल. अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी प्रवेशित मुलाचे आधारकार्ड काढावे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

शाळेत कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही. ऑनलाइन भरलेली माहिती चुकीची असणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी. पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या शासकीय संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन केले.

आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे { रहिवासी पुरावा (रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकपैकी एक) { मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र { दिव्यांग असल्यास दिव्यांगांचे प्रमाणपत्र { आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न) { जन्माचा दाखला

ऑनलाइन लॉटरीनेच मिळणार प्रवेश आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येईल. त्याचे मेसेज पालकांना जातील. पालकांनी कोणत्याही व्यक्तीच्या अामिषाला बळी पडू नये. ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे. कागदपत्रांची छाननी करूनच प्रवेश दिला जाईल. -जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...