आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे लवकर होण्याचा दावा:आरटीओत आता 15 दिवसांतच मिळू शकतील विविध परवाने; प्रशिक्षणासाठी गेलेले अधिकारी पुन्हा परतले

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लर्निंग-पर्मनंट लायसन्ससाठी वाहनधारकांना २-३ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे ते त्रस्त झाले होते. मात्र, प्रशिक्षणासाठी गेलेले अधिकारी पुन्हा रुजू झाल्याने ही समस्या सुटणार आहे. वाहनधारकांना आता कोणताही परवाना १५ दिवसांत मिळेल, असा दावा आरटीओ कार्यालयाने केला आहे. अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याने कामे लवकर होतील, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कायम अधिकाऱ्यांची कमतरता आणि दररोज वाहन परवाने काढण्यासाठी वाढणारी गर्दी यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय व्हायची. दोन महिन्यांपूर्वी लर्निंग लायसन्ससाठी तीन-तीन महिन्यांची वेटिंग होती. तर पर्मनंट लायसन्ससाठी दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागत होती. कारण आरटीओ कार्यालयातील बहुतांश अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले होते. आता ते कामावर परतल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. आरटीओ कार्यालयातील कामाला गती मिळाल्याचे अधिकारी सांगतात.

बारा निरीक्षक कार्यरत : सध्या आरटीओ कार्यालयात १५ मोटार वाहन निरिक्षक आहेत. त्यापैकी दोन अधिकारी उमरगा आणि एक अधिकारी बिलोली चेकपोस्टवर कायम असल्याने त्यांचा औरंगाबाद कार्यालयातील कामांसाठी फारसा उपयोग होत नाही. १२ मोटार वाहन निरीक्षक सध्या सेवेत आहेत. तर प्रशिक्षणासाठी गेलेले सहायक मोटार वाहन निरीक्षक परतले आहेत.

सध्या भरारी पथकात चार मोटार वाहन निरीक्षक, दोन सहायक मोटार वाहन निरीक्षक, वाहन परवान्यासाठी तीन मोटार वाहन निरीक्षक आणि तीन सहायक मोटार वाहन निरीक्षक कार्यरत आहेत.याशिवाय फिटनेससाठी चार निरीक्षक, चार सहायक निरीक्षक, इंटरसेप्टर (स्पीड गण) साठी सहा सहायक निरीक्षक आणि तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या कॅम्पसाठी एक निरीक्षक आणि दोन सहायक निरीक्षक कार्यरत आहेत.

लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस सेवा उपलब्ध

लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाने फेसलेस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या लर्निंग लायसन्स काढता येणे शक्य झाले आहे. तथापि, ज्यांच्या आधार कार्डामध्ये चुका आहेत अथवा अर्धवट माहिती आहे त्यांना फेसलेस परवाना काढता येणार नाही. मात्र, अशा वाहनधारकांच्या कागदपत्रांची पडताळणीही आता कमी वेळ होत आहे. सध्या लर्निंग लायसन्ससाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीची तारीख मिळत आहे.

लर्निंग लायसन्स आता घरी बसून काढता येणार
प्रशिक्षणासाठी गेलेले आरटीओ कार्यालयातील बहुतांश अधिकारी रुजू झाल्याने आरटीओ कार्यालयातील कामाला आता वेग आला आहे. लर्निंग लायसन्स घरी बसून काढता येणार आहे. तर पर्मनंट लायसन्ससाठी वाहनधारकांना २-३ महिने वेटिंग करावी लागत होती. आता हेच काम १५ दिवसांत होत आहे. -संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...