आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीच्या 'रूबरू' उपक्रमाला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद:महापौरांच्या वॉर्डातून श्रीगणेशा, लोकांनी मांडला समस्यांचा पाढा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठीच्या 'रूबरू' उपक्रमाला रविवारी मोठ्या थाटात सुरुवात झाली. औरंगाबादमधील पहिला-वहिला कार्यक्रम माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या नक्षत्रवाडी वॉर्डात पार पडला. यावेळी नागरिकांनी घोडेले यांच्या कामाचे कौतुक केले. सोबतच नागरी समस्यांचा पाढा ही प्रशासनासमोर मांडला.

आपल्या शहरातील नागरिकांच्या नाना समस्या असतात. मात्र, त्या वर्षानुवर्षे सुटत नाहीत. हेच ध्यानात घेत नागरी प्रश्नांना प्रशासनासमोर खुले व्यासपीठ देणे. या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावणे या उद्देशाने राज्यभर दिव्य मराठीचा रूबरू हा उपक्रम सुरू झालाय.

पहिला कार्यक्रम उत्साहात

औरंगाबादमध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर महेश रामदासी, दिव्य सिटीचे इंचार्ज श्रीकांत सराफ आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिका उपायुक्त नंदा गायकवाड, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, पाणीपुरवठा विभाग प्रमुख हेमंत कोल्हे, के. एम. फालक, डॉ. अर्चना गादिया, पोलिस उपनिरीक्षक देविदास शेवाळे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

लेझीम वाजवत स्वागत

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांनी लेझीम खेळत मान्यवर आणि नागरिकांचे स्वागत केले. त्यानंतर नंदकुमार घोडेले यांनी दिव्य मराठीने आयोजित केलेल्या रूबरू उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी वार्ड मधील केलेल्या कामाची माहिती दिली. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रम अडीच तास चालला. यामध्ये नागरिकांनी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्याबाबतचे प्रश्न मांडले. अधिकाऱ्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करू आणि करत आहोत याची माहिती नागरिकांना दिली.

बातम्या आणखी आहेत...