आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सत्ताधारी आमदार अंबादास दानवे  यांची वाहतुकीचे नियमन करताना रिक्षा चालकाला मारहाण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास क्रांती चौकात घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

रिक्षाचालक रेल्वे स्थानकाडून दूध डेअरीच्या दिशेने जात असताना आमदार दानवे हे क्रांती चौक पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यावर वाहतूक नियमन करत होते. या वेळी अचानक रिक्षा चालक आल्यामुळे त्याला मारहाण केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. मात्र, पोलिसांनी या रिक्षा चालकावर कोणतीही कारवाई केली नाही.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी सकाळी शहरात दुपारी चारनंतर लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा केली. त्याची माहिती शहरातील नागरिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. चार वाजेनंतर लॉकडाऊन लागण्याची भिती असल्यामुळे वाहन चालकांनी घर गाठण्यासाठी घाई सुरू केली. क्रांतीचौकात वाहनांची मोठी रांग असल्याचे पाहून खुद्द आमदार दानवे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. अदालत रोडकडून क्रांतीचौकात येणाऱ्या वाहनांनी मोठी गर्दी केली होती. तर सिल्लेखाना चौकातून क्रांतीचौकाकडे येत असलेल्या रस्त्याच्या सिग्नलवर आमदार दानवे कार्यकर्त्यांसह उभे होते. या वेळी वाहतुकीचे नियमन करत असतानाच एक रिक्षा चालक जात होता. त्याला पाहून आमदार दानवे यांचा संताप अनावर झाला. या रिक्षा चालकाला थांबवत आमदार दानवे यांनी भररस्त्यात रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळ करुन त्याला तेथून लगेचच निघून जाण्यास सांगितले. हा प्रकार वाहतुक पोलिसांसमोरच सुरू होता. रिक्षा चालक निघून जात असताना त्याच्यावर मात्र वाहतुक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पण सत्ताधारी आमदाराचे एका रिक्षाचालकाशी असे वर्तन पाहून नागरिक आश्चर्यचकीत झाले.

बातम्या आणखी आहेत...