आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:सत्ताधारी, विरोधक पाणीप्रश्नात अपयशी, महापालिका निवडणुकीत आप सक्षमपणे लढणार : महादेव नाईक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी व विरोधी पक्षांनी शहरवासीयांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता आलेले नाही. मूलभूत प्रश्नच कायम आहेत. हीच मोठी शोकांतिका असून त्यांना चांगला पर्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक सक्षमपणे लढणार आहे. दिल्ली, पंजाबमधील जनतेने आपच्या विकासकामांवर विश्वास ठेवला. औरंगाबादकरकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. यातून परिवर्तन होईल, असा विश्वासही आपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी व्यक्त केला.

आपच्या संघटन कौशल्याचा आढावा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कुलस्वामिनी मंगल कार्यालयात बैठक झाली. महाराष्ट्र व औरंगाबादकरांनाही परिवर्तनासाठी ‘आप’चा सक्षम पर्याय हवा आहे. त्या दृष्टीने निवडणुकीचे पूर्व नियोजन करत आहोत. मतदारांच्या घरोघरी जाऊन सत्ताधारी व विरोधकांचे अपयश सांगणार आहोत. तसेच विकासाचा जाहीरनामा सादर करून आम्हाला मत का द्यावे, याबाबत अभियान राबवले जाणार असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.

सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढणे म्हणजे ढोंगीपणा
सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चे काढणे हा ढोंगीपणा आहे. शाळा, रुग्णालयांची वाताहत लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, असे राज्य संयोजक रंगा राचुरे म्हणाले. यावेळी राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, जिल्हाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील, श्रीकांत आचार्य, मराठवाडा सचिव अनिल ढवळे, सदाशिव पाटील, शेख उस्मान, मोहंमद बशीर, डॉ. शिवाजी कान्हेरे, आशा सावळे, सुनील भालेराव, मेघा राईकवार, प्रशांत इंगळे, प्रवीण हिवाळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...