आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धनीती:युक्रेनवर नव्या हल्ल्यासाठी रशियाची तयारी; दोन लाख सैनिक तैनात करणार, कीव्हची पुन्हा नाकेबंदी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवर नव्याने हल्ला करण्यासाठी रशियाकडून लष्कर आणि हत्यारांची जमवाजमव सुरू आहे. जानेवारी किंवा त्यानंतर वसंत ऋतूत रशिया पूर्वेला डोनबास आणि दक्षिणेकडून हल्ला करू शकतो. उत्तरेकडील बेलारूसमधूनही हल्ल्याची शक्यता आहे. रशियाचे सैनिक यूक्रेनच्या सैनिकांना मागे ढकलतील. राजधानी कीव्हवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न ते पुन्हा करतील. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेंस्की, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल व्हेलेरी जलझूनी आणि लष्करप्रमुख जनरल ओलेक्सांद्र सिरस्की यांचा हा अंदाज आहे. जनरल जलझूनी यांनी इकॉनॉमिस्टला सांगितले, की रशिया जवळपास दोन लाख नवीन सैनिक तयार करत आहे. पाश्चिमात्य देशांच्या सूत्रांचे म्हणणे आहे, की रशियन कमांडर जनरल सर्जी सुरोविकिन यांना वाटते की हे युद्ध अनेक वर्षे सुरू राहणार आहे. बर्फवृष्टी आणि चिखलामुळे युद्ध थांबल्यात जमा आहे. एक हजार किलोमीटरपर्यंत युद्धाशी संबंधित कोणतीही हालचाल नाही. ब्रिटनचे सर्वात वरिष्ठ अधिकारी अॅडमिरल सर टोनी राडाकिन यांनी या आठवड्यात सांगितले, की रणगाडे, सशस्त्र वाहने आणि तोफगोळ्यांच्या कमतरतेमुळे रशियाची जमिनीवरील मोहीम अत्यंत धीमी झाली आहे. यामुळे शांतता चर्चेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चर्चा केली. तथापि, यूक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की फार लवकर असे घडणार नाही. यूक्रेनने युद्ध रोखले तर नवीन हल्ल्यासाठी रशिया चांगल्या प्रकारे सज्ज होऊ शकतो. ते म्हणतात, की सैनिकांना नव्याने प्रशिक्षण देऊन त्यांना तैनात करण्यावर रशियन लष्करी अधिकाऱ्यांचा भर आहे. तोफगोळ्यांचे उत्पादन केेले जात आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या हिमार्स रॉकेट सिस्टीमद्वारे यूक्रेनने रशियाचे रणगाडे, बख्तरबंद वाहने आणि कमांड, नियंत्रण कक्षांचे मोठे नुकसान केले. मात्र, रशियाने आपली केंद्र हिमार्सच्या टप्प्याच्या बाहेर नेले आहे. जनरल जलझूनी सांगता, की यूक्रेनकडे हत्यारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचे अँटी एअरक्राफ्ट सिस्टम पूर्व सोव्हिएत काळातील आहेत. अमेरिकेच्या पॅट्रियॉटसारख्या चांगल्या अण्वस्त्ररोधी सिस्टीमची यूक्रेनला गरज आहे. पॅट्रियॉट मिसाइल येत आहेत, पण सैनिकांना त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे. युद्धात विजय मिळवण्यासाठी मजबूत हवाई प्रतिरक्षा प्रणालीसह आणखी काही भूबाग ताब्यात घ्यावा लागेल. तो जल मार्ग आणि काही बंदरेही मुक्त करू इच्छितो. यूक्रेनला पूर्ण सहकार्य मिळाले तर त्यांचे लष्कर रशियाने फेब्रुवारीनंतर ताब्यात घेतलेला सर्व भूभाग परत घेऊ शकतात. ९५% युक्रेनी लोकांना सर्व भूभाग परत हवा आहे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी सांगितले, की यूक्रेनच्या ९५-९६% टक्के लोकांना वाटते की त्यांच्या देशाचा संपूर्ण भूभाग पुन्हा परत मिळवावा. यासाठी ते कोणताही त्याग करायला तयार आहेत. २०१४ आणि या वर्षी रशियाने आमच्या जेवढ्या भूभागावर कब्जा केला आहे, तो सर्व परत घ्यायला हवा, अशी आमची इच्छा आहे. आमच्या देशाच्या अखंडतेसाठी पाश्चिमात्य देशांची सुरक्षेची हमी कमकुवत सिद्ध झाली आहे. १९९४ मध्ये यूक्रेनने सोव्हिएत अण्वस्त्रे परत केली होती, त्यावेळी अमेरिका, ब्रिटनने अशी हमी दिली होती. २० वर्षांनंतर ही हमी कुचकामी ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...