आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी नोकरीच्या अपेक्षेने वर्षानुवर्षे दिवस-रात्र मेहनत केल्यानंतर पेपर फुटतो तेव्हा केवळ पैसे आणि वेळेचाच अपव्यय होत नाही, तर अनेक परीक्षार्थी आपले आयुष्यच संपवून टाकतात. वेदनेच्या या तीन कथा शेकडो तरुणांच्या व्यथा-कथा सांगतात...
केस-१ : वाटले होते, नोकरी मिळाली तर वडिलांची मजुरी सुटेल
‘आता वडिलांना मजुरी करावी लागणार नाही असे मला वाटत होते. मात्र, सॉरी पप्पा...मी असे करू शकलो नाही. सुसाइड नोट लिहिणे घाबरटांचे काम आहे हे मी जाणतो. मी भित्रा तर नाही, पण कधी-कधी माणूस खूप थकतो. २०१९ पासून मी तयारी करत आहे. आज २०२२ मध्येही संघर्ष करतोय. मी परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण होईल हे मला ठाऊक आहे. मात्र, आता मला निराश झाल्यासारखे वाटत आहे. कारण पेपरफुटीमुळे परीक्षा होईल की नाही माहीत नाही. कोणतीच तारीख ठरलेली नाही. यामुळे मी त्रस्त आहे. आयुष्यात पुढे काय करायचे आहे? काहीच नक्की नाही. स्वप्ने तर खूप आहेत. त्यासाठी खूप कष्टही घेतले, पण कदाचित ते कमी पडले.’ ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरातच्या गोंडल येथील जयेशने लिपिकाचा पेपर फुटल्यानंतर हे पाऊल उचलले.
केस-२ : दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले, तणावात होतो
डिसेंबर २०२२ ची घटना आहे. रीट लेव्हल-२ चा पेपर फुटल्यानंतर राजस्थानच्या हनुमानगडमध्ये कन्हय्यालालने विष प्राशन करून जीव दिला. ६ दिवसांनंतर त्याचा मृतदेह आढळला. सुसाइड नोटमध्ये लिहिले होते, ‘सॉरी पप्पा, आता माझ्यासाठी काहीच राहिलेले नाही. कृपया मला माफ करा.’ दोन वर्षांपूर्वीच या तरुणाचे लग्न झाले होते. त्याने यापूर्वीही रीटचा पेपर दिला होता. तेव्हा १३५ गुण मिळाले होते आणि नोकरीची शाश्वतीही होती. मात्र, पेपर फुटल्याने परीक्षा रद्द झाली. मग वनपालाची परीक्षा दिली, पण तोही पेपर फुटला. यामुळे तो खूप तणावात होता.
केस-३ : नीट पेपरफुटीच्या वृत्ताने धक्काच बसला
सप्टेंबर २०२१, तामिळनाडूतील वेल्लोर येथील १७ वर्षांच्या मेडिकल विद्यार्थ्याने नीटचा पेपर फुटल्याने आत्महत्या केली. त्याच्या मजूर आईने रडतच सांगितले, ‘माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचे होते. आत्महत्येपूर्वी तिने नीटच्या पेपरफुटीचे वृत्त दाखवले होते. ती रात्रभर रडत राहिली.’ अशाचप्रकारे राजलक्ष्मी नावाच्या मेडिकल विद्यार्थिनीनेही आत्महत्या केली होती. तिसऱ्यांदा नीट परीक्षा दिल्यानंतर ‘आन्सर
की’ इंटरनेटवर आल्याचे कळाल्यानंतर आता आपण परीक्षा उत्तीर्ण होणार नाही, हे समजल्यानंतर ती घाबरली. याच तणावामध्ये तिने आत्महत्या केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.