आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारांचा सामना:ज्येष्ठांच्या आरोग्यावर लक्ष देणार सदाचार संवर्धक संघ : आचार्य

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्तीनंतर ज्येष्ठांपुढील सर्वात मोठी समस्या त्यांच्या आरोग्याची असते. त्यांना जर विविध सामान्य आजारांचा सामना करण्यासाठी टिप्स मिळाल्या, तज्ज्ञांचा सल्ला मिळाला तर आयुष्य अधिक सुखकर होते. त्यामुळे पुढील वर्षभरात कर्करोग, मधुमेह, विसराळूपण, रक्तदाब, डोळे-कानाचे आरोग्य अशा विविध विषयांवरील किमान १२ ते १५ सत्रांचे आयोजन करण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, अशी माहिती सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संघाचे नवीन अध्यक्ष अनंत आचार्य यांनी दिली.

कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी श्रीकांत देशपांडे, सचिवपदी अनिल चौधरी, सहसचिवपदी प्रकाश कुलकर्णी, कोषाध्यक्षपदी मधुकर देशपांडे यांची निवड झाली आहे.याखेरीज शशिकांत शास्त्री, शिवाजी शेवाळे, शैलजा आचार्य, मीरा शास्त्री यांचीही सदस्यपदी निवड झाली. लक्ष्मण डाकणे निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

बातम्या आणखी आहेत...