आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारीला टपाल पाकिटावर मिळाले स्थान, वाहतुकीची जबाबदारही स्वीकारली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • संत्रा, अंजीर, द्राक्षचाही होणार समावेश

मराठवाड्याचा केशर, मंगळवेड्याची ज्वारीला जीआय मानांकन मिळालेले आहे. भारतीय टपाल खात्याने एक पाऊल पुढे टाकत पोस्ट पाकिटावर स्थान दिले आहे. याच बरोबर उत्पादक ते ग्राहक, शेत ते बाजारपेठापर्यंत वाहतुकीची जबाबदारही स्वीकरली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सोलापुरची चादर व टॉवेलचा समावेश करण्यात आला होता. तर नागपुरची संत्रा, पुरंदरचे अंजीर, नाशिकच्या द्राक्ष, डाळिंब आदी जीआय नामंकन प्राप्त शेतमाल लवकरच पोस्ट पॉकिटावर स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकनार आहेत.

केंद्र व राज्य सरकार, कृषी विभाग आणि टपाल खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जीआय नामांकन प्राप्त शेतमालाला पोस्ट पॉकिटवर स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी औरंगाबाद छावणी मुख्य कार्यालयात जनरल पोस्टमास्तर व्ही. एस. जयाशंकर यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एम. बी. पाटील, कृषी भूषण तथा केशर आंबा उत्पादक संघ मराठवाडा उपाध्यक्ष विजय अण्णा बोरडे आदी उपस्थित होते.

संपूर्ण भारतात केशर आंब्याला महत्तपूर्ण स्थान
कोकणातील हापूस आंब्याला जगात मान्यता असली तरही मराठवाड्यातील केशर कुठेच मागे नाही. चव, रंग, वजनामुळे केशर आंब्याला स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. मानांकन मिळाल्याने केशर ब्रँड जगप्रसिद्ध झाला आहे. त्यात पोस्ट खात्याने पाकिटावर मानाचे स्थान देऊन गौरव केला आहे. या कौतूकामुळे प्रचार प्रसार होऊन मागणी वाढेल व भावही चांगला मिळेल असा विश्वास जनरल पोस्टमास्तर जयाशंकर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कोकणच्या हापुस एवढीच लोकप्रियता केशरला मिळाल्याचे अभिमानाने सांगितले. पोस्ट खात्याच्या उपक्रमामुळे आंबा उत्पादकांना सुगीचे दिवस येणार असून उन्नती साध्य होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. डॉ. मोटे, बोराडे, पाटील यांनी पोस्टाच्या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन अपर्णा अध्यापक यांनी तर आभार शाम निलकंठ यांनी मानले. पोस्ट खात्यातर्फे स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा गौरव करण्यात आला. ​​​​​​​

28 शेतमालाला जीआय मानांकन
महाराष्ट्रातील अनेक वर्षांच्या परिश्रमातून 28 शेतमाल उत्पादनांना जीआय मानांकन (जिगोग्राफिकल इंडिकेशन) मिळाले आहे. या सर्व उत्पादनामध्ये एका गोष्टींचे साम्य आहे, ते म्हणजे या सर्वच उत्पादनांना भौगोलिक असे चिन्हांकित केलेले आहे. केंद्र सरकारच्या एका संस्थेच्या वतीने उत्पादनाचा दर्जा, उपयोगीता, उत्पादनातील सारखेपणा यांची काटेकोर तपासणी करून अशा दर्जाचा निकष लावून नंतरच असे जीआय नामांकन दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...