आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभजनी मंडळाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात, हाती भगवे झेंडे घेऊन साईबाबांच्या नामस्मरणाने साई पालखी निघाली. या सोहळ्यात शंभर महिला, ३०० हून अधिक पुरुषांनी सहभाग नोंदवला. श्रीराम प्रतिष्ठान, शिवसेना शाखा पूर्व विभागातर्फे पालखी काढण्यात आली. पालखीचे चौथे वर्ष होते.
न्यू हनुमाननगर येथील हनुमान चौकातून रविवारी सोहळ्याला सुरुवात झाली. रथामध्ये साईबाबांची मूर्ती ठेवली होती. साईबाबांचे नामस्मरण करत पालखी सोहळ्याचा जयभवानी चौक, कामगार चौक, एपीआय कॉर्नर, ठाकरेनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणामार्गे सुंदरवाडी येथील साईबाबा मंदिरात समारोप झाला. या वेळी माजी खा. चंद्रकांत खैरे, अभिजित देशमुख, संतोष जेजूरकर आदींची उपस्थिती होती. अडीच क्विंटलची ़डाळबाटी: साईभक्तांना गोकुळ स्वीट येथे नाष्टा, कामगार चौकात चहा, मुकुंदवाडी येथे नाष्टा, रामनगरात पालखीचे स्वागत केले. साई मंदिरात ५०० भाविकांसाठी अडीच क्विंटलची डाळबाटीचा प्रसाद करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.