आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणी एकता क्रिकेट प्रीमियर लीग:साई संघ चॅम्पियन, केसर सुपर उपविजेता

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साई संघाने शानदार कामगिरी करत पहिल्या छावणी एकता क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. केसर सुपर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात साई संघाने केसरवर ९ गडी राखून मात केली. या लढतीत अष्टपैलू किरण बडादे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून साई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केसर संघाने १० षटकांत ३ बाद ९२ धावा उभारल्या होत्या. विजेत्या संघाला २१ हजार व चषक आणि उपविजेत्या संघाला १५ हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विविध वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली होती. बक्षीस वितरण प्रसंगी बाळासाहेब गायकवाड, अशोक सायन्ना यादव, अश्फाक खान, उमर खान, संजय सोनवणे, रख्माजी जाधव, आयोजक सदानंद धांडे, सुरेश वर्मा विजय पाटील आदी उपस्थित होते.

राजेश, अमितची फटकेबाजी प्रत्युत्तरात, साई संघाने ५.५ षटकांत १ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर किरण बडादेने नाबाद ३५ धावांची विजयी खेळी केली. राजेश पवारने फटकेबाजी करत ९ चेंडूंत ३ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचत २४ धावा ठोकल्या. कर्णधार अमित गौरनेदेखील फटकेबाजी केली. त्याने ८ चेंडूंत ३ षटकार मारत नाबाद २१ धावांचे योगदान दिले. संघाने अवघ्या ३५ चेंडूंत विजय मिळवला. संघाला १३ धावा अतिरिक्त मिळाल्या.

बातम्या आणखी आहेत...