आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तनकार प्रदीप सोळुंकेचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:पैसे कमावण्याचे मशीन होऊ नका; स्वत: ला जसे आहे तसे स्वीकारा

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयत्न, चिकाटी, सातत्य या गुणांच्या आधारे कोणत्याही क्षेत्रात टॉप वर जा. पण फक्त पैसे कमावण्याचे मशीन होऊ नका ' असे आवाहन वक्ते, किर्तनकार प्रदीप सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना केले.

औरंगाबादेतील मराठा समाज प्रतिष्ठान संचलित ' मराठा विद्यार्थी वसतिगृह ' तथा मराठा सेवा संघ संचलित ' राष्ट्रमाता जिजाऊ गर्ल्स हॉस्टेल ' च्या संयुक्त विद्यमाने ' छत्रपती संभाजी महाराज करिअर अकादमी ' च्या वतीने आयोजित व्याख्यानास या प्रसंगी विचार मंचावर या प्रतिष्ठानचे सचिव विंगकमांडर टी.आर.जाधव, प्रसिद्ध उद्योगपती सुनील किर्दक, अकॅडमीचे प्रमुख इंजिनीयर बी.बी शिंदे, हॉस्टेलचे अधीक्षक प्रा. भाऊसाहेब शिंदे, रंगनाथ बनसोडे, आदी उपस्थित होते.

पैसे कमावण्याचे मशीन होऊ नका

सोळुंके म्हणाले की, ' स्पर्धा परीक्षेत वशीला न लावता, पैसे न देता मोठ्या पोस्टवर गेलेले लोक हुंडा घेतात, भ्रष्टाचार करतात ही अशी मंडळी समाजद्रोही आणि देशद्रोही मानायला हवीत. दोन पैसे कमावतात या संस्कारातून निश्चित हे भारताचे आदर्श नागरिक बनतील असा मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.

स्वत: ला जसे आहे तसे स्वीकारा

तसेच मी गरीब, काळा, बुटका, नकटा हे न्यूनगंड न बाळगता सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करा आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा. जे लोक क्षणा क्षणाचा वापर करतात ते इतिहास घडवतात. त्यामुळे मुहूर्त शुभ अशुभ या भानगडीत न पडता सतत कार्यरत रहा. दिल्ली ताब्यात घेऊन ही सत्ता जनहितासाठी वापरणे हे शिवरायांचे स्वप्न होते. त्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याचे तोंड दिल्लीकडे असते. हे शिवरायांचे स्वप्न महाराष्ट्रातील तरुणांनी दिल्ली ताब्यात घेऊन पूर्ण करावे, असे हे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...