आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरेंचा मनसेवर हल्लाबोल:म्हणाले -आमच्या जून्या मित्रांनी 'राज'सभा स्पॉन्सर केली; पैसे देऊन राज यांच्या सभेला गर्दी जमवली जातेय

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला अवघे काही तास उरले आहेत. राज ठाकरेंच्या सभेबाबत अनेक विरोधी पक्षांनी टीकेचा भडीमारही केला आहे. आता नेमकी सभा सुरु होण्याच्या काही तास आधी यात चंदक्रांत खैरेंनीही राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. राज यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा आरोप चंद्राकांत खैरेंनी केला आहे.

मला विचारण्यापेक्षा स्वत: तिथे जमलेल्या लोकांचा विचारा की, तुम्ही कुठुन आले, किती पैसे मिळाले? लोक स्वत: तुम्हाला या बद्दल माहिती देतील असेही खैरे यांनी पत्रकारांना आवाहन केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये आज सभा घेणार असून, या सभेनंतर औरंगाबादमधील राजकीय गणित मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेसाठी तर ही मोठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे
शिवसेनेचे माजी खासदार चंदक्रांत खैरे यांनी आज पून्हा एकदा मनसेच्या गर्दीवर भाष्य केले आहे. भाष्य करतांना खैरे म्हणाले की, मनसेच्या सभेला लाख लाख लोक आले तरी आम्हाला अजिबात फरक पडणार नाही. ही गर्दी आमच्या जून्या मित्रांच्या पाठिंब्याने जमवली जात आहे. दरम्यान या गर्दीला कुणाची स्पॉन्सरशिप आहे, हे पत्रकारांनी शोधून काढा असे थेट आवाहान चंदक्रांत खैरे यांनी केले.

मला लोकांनी केले फोन - चंदक्रांत खैरे
मनसेच्या सभेत येणारे लोक पैसे घेऊन येणार आहेत. ही माहिता देत असतांना चंदक्रांत खैरे म्हणाले. मला स्वत: वैजापूर आणि औरंगाबाद ग्रामीण भागातून फोन आला. 5 हजार रुपये घ्या, आणि चहा-नाश्ता करा व आजच्या सभेला हजर राहा अशी ऑफर चंदक्रांत खैरेना मिळाली. सभेसाठी होणारी गर्दी कोणत्या स्वरुपाची असेल हे तुम्हीच ठरवा असे वक्तव्य चंद्राकांत खैरेंनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...