आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीप जैस्वाल वापस येतील:औरंगाबादचे आमदार कडवट शिवसैनिक, ते परत येणार; चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला विश्वास

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औंरगाबादचे शिवसेनेचे आमदार जरी सध्या संपर्कात नसले तरी ते पुन्हा परत येतील असा मला विश्वास आहे. प्रदीप जैस्वाल माझ्याप्रमाणेच कडवट शिवसैनिक आहेत. आमची पहिल्यापासून जोडी आहे. त्यामुळे ते शिवसेना सोडणार नाहीत. तसेच संदीपान भुमरे यांना देखील मंत्रीपद दिलेले आहे. त्यामुळे ते पुन्हा परत येतील. माझा देखील संपर्क साधणे सुरू आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

शिवसेनेने मोठे केले

खैरे म्हणाले की, यापूर्वी युतीचे सरकार होते. आता महाविकास आघडीचे सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काही कामे नाही झाल्यास नाराज होण्याची गरज नाही. काहीही ओळख नसलेले अनेकजण शिवसेनेमुळेच मोठे झालेले आहेत. त्यांचे नाव मोठे झाले आहे.

आमदारांच्या संपर्कात

खैरे म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांची कडवट शिवसैनिक अशी ओळख आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे सोबत गेले असले, तरी त्यांचा उद्ध्व ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. मी स्वत: आमदारांना संपर्क करत असल्याचे त्यांनी सागंतले. तसेच मी स्वत: मुंबईला निघालो असल्याचे त्यांनी सांगितले.