आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:सिल्कमिल कॉलनीतील घरात गांजाची विक्री; दोघांना पकडले, पोलिसांनी शुक्रवारी पहाटे कारवाई केली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्कमिल कॉलनीतील घरात गांजाची विक्री करणाऱ्या टपरीचालकासह तस्कराला पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. या दोघांकडून २२ हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. अक्षय सुरेश फुंदेला (२२, रा. शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी) आणि शेख नईम शेख जमिरोद्दीन (४४, रा. सिल्कमिल कॉलनी, धनगरवाडा, बीड बायपास) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी फुंदेला ३, तर शेख नईमला ४ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

बजाजनगर येथील रामलीला मैदानाजवळील साई पान सेंटरचा चालक गांजाची विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उपनिरीक्षक चेतन ओगले यांनी पथकासह छापा मारून अक्षय फुंदेच्या पानटपरीतून दहा हजार ९८० रुपयांचा गांजा जप्त केला. तसेच शेख नईम याच्या घरात गांजाचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सिल्कमिल कॉलनीतील घरावर छापा मारून दहा हजार ९८० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...