आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठे:पावसाळ्याआधी बाजारपेठेत रंगीबेरंगी-नावीन्यपूर्ण रेनकोट, छत्र्यांची विक्री; यंदा 15 ते 20 टक्क्यांनी किमतीही वाढल्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा म्हटलं की कधीही धो-धो पाऊस पडेल, याची शाश्वती नसते. परंतु या धामधुमीत अनेकांना ऑफिस, तर चिमुकल्यांना शाळेत जाण्याची ओढ असते. त्यामुळे पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारच्या विविध रंगांच्या व आकाराच्या छत्र्या आणि रेनकोट विक्रीसाठी उपलब्ध झाले असून यंदा १५ ते २० टक्क्यांनी किमतीही वाढल्या आहेत. रंगीबेरंगी आणि नावीन्यपूर्ण छत्र्यांनी बाजारपेठ बहरली आहे. यात पर्समध्ये सहज बसणाऱ्या दोन व तीन घडीच्या छत्र्या आकर्षक ठरत आहेत. तरुणींसाठी झालर छत्र्यांचा ट्रेंड आलाय. जुन्या काळातील लांब, आजोबांच्या काठीसारख्या छत्र्यांनादेखील अजूनही मागणी आहे. या छत्र्यांचा युवकही वापर करत आहेत. बाजारपेठेत लहान छत्र्या उपलब्ध झाल्या तरी मोठया छत्र्यांचा ट्रेंडही कालबाह्य झाला नाही. लहान मुलांसाठी ८० ते १५० रुपये, मोठ्यांची छत्री १२० ते ३०० रुपये, तर विविध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ७०० ते २ हजारांपर्यंत छत्र्या उपलब्ध आहेत.

अम्ब्रेला, लाँग कोट, टॉप विथ स्कर्ट रेनकोटला तरुणाईची पसंती छत्र्यांबरोबरच पावसाळ्यात रेनकाटलाही अतिशय महत्त्व आहे. तरुणाईसाठी वॉटर प्रिंट, ट्रान्सपरंट, चेन, मिड टॉप, लाँग टॉप आदी रेनकोट उपलब्ध आहे. तरुणांसाठी पँट-शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्सपरंट आदी प्रकार दाखल झाले आहेत. अम्ब्रेला, लाँग कोट, टॉप विथ स्कर्ट आदींना तरुणाई पसंती देत आहे. विशेषत: झीलसारख्या कंपन्यांचे काही ब्रँडचे रेनकोट आहेत. यात रेन फायटर, वॉटर फायटर, झील आदी उपलब्ध आहेत. लहान मुलांचे रेनकोट २०० ते २५० रुपये, महिला-युवतींसाठी २५० ते ८००, तर पुरुषांसाठी ५०० ते १५०० रुपयांपर्यंत रेनकोट उपलब्ध आहेत.

वाहतूक खर्चामुळे किमती वाढल्या ^दरवर्षी २५ हजार छत्र्यांची विक्री होते. यंदा १५ ते २० टक्के किमती वाहतूक खर्च व इतर साहित्य महाग झाल्यामुळे वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा छत्र्यांसह रेनकोटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. -जयचंद करमाणी, रूपमिलन, छत्र्या, रेनकोटचे होलसेल विक्रेते

बातम्या आणखी आहेत...